मला न समजलेले छत्रपती शिवाजी महाराज

     


 तसा मी नेहमी इंग्रजीमध्ये ब्लॉग लिहितो पण आज मी मराठीमध्ये लिहतोय. कारण विषयच तसा आहे माझा आवडता, त्यामुळे मी आज मराठीतच बोलेल.

        महाराज ! राजे ! यापैकी कोणताही शब्द कानावर पडला की कसं, कोणत्याही मन:स्थितीत मध्ये असलो तरी चेहऱ्यावर वेगळा रंग खेळू लागतो. होय! मी आज आपले जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलणार आहे.

        लहानपणी किल्ला बांधताना बहुतांशी महाराजांचा परिचय झाला. जेव्हा आम्हाला घरच्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज हे आपले कैवारी आहेत तेव्हापासून महाराजांबद्दल जाणण्याची व ऐकण्याची उत्कंठा निर्माण झाली आणि ती आजवर प्रफुल्लीतच आहे. मग पुढे जाऊन इयत्ता चौथी मध्ये महाराजांचा इतिहास पदरी पडला. पण खरं सांगायचं झालं तर महाराज आम्हाला तेव्हाही नीट समजले नाही, ना की आजवर समजले. अहो ! किती मोठी ती टाप त्या अभेद्य सह्याद्रीवर आणि हिंदुस्थानावर, कसं शक्य आहे इतक्या सहज समजणे महाराजांबद्दल . म्हणूनच लहानपणापासून काही प्रश्न डोक्यामध्ये थया थया नाचताहेत.
      
       बघा ना! ज्या वयात आम्ही वेलांटी उकार यांच्यासोबत रुसवा - फुगव्याचे डाव मांडत होतो महाराजांनी ३ संस्कृत लेख लिहिले होते आणि १३ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले होते. वयाच्या १३-१४ वर्षी कसं काय इतकं ज्ञान अवगत केला असेल बरं ?
      
       अवघ्या सोळाव्या वर्षी कसं काय बरं स्वराज्याचे तोरण बांधले असेल ? आणि आम्ही एवढे मोठे घोडे झालो तरीही आमचं आयुष्य कुठे चाललंय आणि कसं चाललंय याचा ठावठिकाणा नाही.
     
       असं काय असेल त्या मैत्रीमध्ये की तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाचं लग्न सोडून महाराजांच्या शब्दाखातर आणि प्रेमापोटी कोंढाणा वर आगेकूच केली ?
      
       कसा बरं असेल महाराजांचा आराखडा व गनिमी कावा, की बहिर्जी नाईक यांच्यासारखा बहुरूपी, शत्रूच्या छावणीमध्ये दिवसोंदिवस राहून महाराजांना अचूक बातमी पोचवत असत ? जे बहिर्जी नाईक शत्रूला ही नजरेस पडले नाही किंवा बहुतांश स्वराज्यातील लोकांना ओळखू येत नसेल अशा आसमास महाराज चुटकीसरशी ओळखत असे, काय तो दृष्टिक्षेप ? आणि आम्ही साधे कोणी दाढी जरी करून आला तरी पटकन ओळखू शकत नाही.
       
        कुठून बरं आली असेल हिम्मत त्या राक्षस अफझलखानाचा कोथळा बाहेर काढताना ? आम्ही आमच्याच सावलीला दहावेळा घाबरतो.
      
       काय बरं चालत असावं त्या बुद्धीमध्ये की एक से एक गनिमी काव्याची कल्पना येत असत ? आमचे घरचे म्हणतात तुझ्या बुद्धीला बुरशी चढली आहे बघ.
      
     राजांच्या प्रेमा मध्ये काय गेहराही असेल की मुंडकं उडालं तरीही महाराजांचा जीव सुखरूप रहावा म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांचे दांडपट्टा तसाच चालू होता? 
     
        कसं बरं एका कर्तुत्ववान पुत्राची व प्रभावशाली पित्याची भूमिका बजावली असेल ? 
         
        महाराजांची आपल्या प्रजेवर का बरं इतकी मर्जी, जिव्हाळा असेल..? इथे सध्या प्रजेची मज्जा बघत बसलेत !
       
        महाराजांचा निर्णय कसा ठाम असेल की महिलांवर व दीन-दुबळ्यांवर अत्याचार झाल्यास, जागीच शिक्षा ठोठावत ?
      
       आमच्या आदरणीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची काय ती शिकवण व मातृत्व की पुत्र जगज्जेता झाला ?
      
       का बरं आम्हा लेकरांना पुन्हा पुन्हा गडांवर भ्रमंती करून महाराजांचा आभासी सहवास अनुभवासा वाटतो ?   
 
       म्हणूनच आज आपला प्रत्येक मावळा अभिमानाने म्हणतो की
         "भूपती,गडपती, गज-अश्वपती, प्रजापती, सुवर्णरत्नंश्रीपती, अष्टावधानजागृत, अष्टप्रधान वेष्ठीत, न्याया लंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, सकलगुणमंडीत अखंडलक्ष्मी अलंकृत, न्यायनीती धुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर ,क्षत्रियकुलावतंस ,सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज,योगिराज,भगवंत, गुणवंत, यशवंत, किर्तीवंत, पुण्यवंत, नीतीवंत, मूर्तिमंत, वरदवंत, श्रीमंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय! की जय! की जय!

          महाराज आम्हाला तुमचा वावर, थरार, संघर्ष एकदा तरी अनुभवायला मिळावी हीच जगदंबा चरणी प्रार्थना.




   -जगदंब 🚩

Comments

  1. Speechless.
    Just Amazing 🌼..

    ReplyDelete
  2. Bhava jaam bhari lihila ahes...Read Karun Khup bhari vatal Keep it up Surja..❣️❣️

    ReplyDelete
  3. जाणीजे यज्ञ कर्म ,अखंड ठेवीले ऐसे...

    ReplyDelete
  4. नि:शब्द🙌🏻 खुप जास्त भारी..🙏🚩महाराज🚩🙏 keep going ✌🏻

    ReplyDelete
  5. नि:शब्द🙌🏻 खुप जास्त भारी..🙏🚩महाराज🚩🙏 keep going ✌🏻

    ReplyDelete
  6. पाटील मस्त लिहिलंय 👌👌. 🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद . जय शिवराय

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

The Masculinity.

Live a Little "MAN"