मला न समजलेले छत्रपती शिवाजी महाराज

तसा मी नेहमी इंग्रजीमध्ये ब्लॉग लिहितो पण आज मी मराठीमध्ये लिहतोय. कारण विषयच तसा आहे माझा आवडता, त्यामुळे मी आज मराठीतच बोलेल. महाराज ! राजे ! यापैकी कोणताही शब्द कानावर पडला की कसं, कोणत्याही मन:स्थितीत मध्ये असलो तरी चेहऱ्यावर वेगळा रंग खेळू लागतो. होय! मी आज आपले जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलणार आहे. लहानपणी किल्ला बांधताना बहुतांशी महाराजांचा परिचय झाला. जेव्हा आम्हाला घरच्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज हे आपले कैवारी आहेत तेव्हापासून महाराजांबद्दल जाणण्याची व ऐकण्याची उत्कंठा निर्माण झाली आणि ती आजवर प्रफुल्लीतच आहे. मग पुढे जाऊन इयत्ता चौथी मध्ये महाराजांचा इतिहास पदरी पडला. पण खरं सांगायचं झालं तर महाराज आम्हाला तेव्हाही नीट समजले नाही, ना की आजवर समजले. अहो ! किती मोठी ती टाप त्या अभेद्य सह्याद्रीवर आणि हिंदुस्थानावर, कसं शक्य आहे इतक्या सहज समजणे महाराजांबद्दल . म्हणूनच लहानपणापासून काही प्रश्न डोक्यामध्ये थया थया नाचताहेत. ...